दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा. प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्याचे माजी आमदार श्री. ईश्वरराव भोसीकर साहेब यांची भिमाशंकर सहकारी संस्था मर्यादित गोपाळचावडी ता. जी. नांदेड च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी माजी आमदार श्री. वसंतराव चव्हाण साहेब यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी श्री. एकनाथराव मामडे साहेब यांची करण्यात आली आहे. यावेळी श्री.श्री.श्री.१००८ भीमाशंकर लिंग महास्वामीजी केदार जगद्गुरू यांनी आशिर्वाद दिले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.माजी आमदार श्री. गंगारामजी ठकरवाड साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. हरिहरराव भोसीकर साहेब, श्री. बाबुराव देशमुख,श्री.राजूअप्पा एकलारे, श्री. बालाजीराव पांडागळे आदी सह संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.