दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
मायलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
जव्हार:- जन्मदात्या आईनेच स्वतःच्या पोटच्या तीन वर्षाच्या मुलीचा खून करून मृतदेह कचऱ्यात फेकून देण्याचा संतापजनक प्रकार जव्हारमध्ये उघडकीस आला आहे.आपली तीन वर्षाची मुलगी सना जव्हार शहरात सुरू असलेल्या उरुसात हरवल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याच्या या निर्दयी मातेने प्रयत्न केला होता.मात्र पोलिसांची तपासाची चक्रे जलद गतीने फिरताच जन्मदात्या मातेनेच खून करून तो मृतदेह पिशवीत भरून फेकून दिल्याचे उघड झाले.
जव्हार मधील बायपास रस्त्यावर अचानक नगर येथे राहणारी आरोपी अफसाना उर्फ तारा सुलेमानी वय ३७ या महिलेने आपल्याच पोटच्या गोळ्याला ठार मारून प्लास्टिकच्या पिशवीत भरून तो मृतदेह फेकून दिला होता.या निर्दयी मातेने तिच्या घराच्या बाजूला असलेल्या बेकरीच्या समोरील ढीगार्यावर मृतदेह फेकून आपली मुलगी हरवल्याचा खोटा बनाव रचला केला होता.मृत्य सनाचा मृतदेह समोरच असलेल्या बेकरी समोरील ढीगाऱ्यावर आरोपी अफसानाने फेकला होता.त्या ठिकाणी राहणाऱ्या शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.पोलिसांनी तपासाची चक्रे मृत सनाच्या आईच्या भोवती फिरवण्यास सुरुवात करतातच अफसानाने मीच हत्या केल्याचे कबूल केले.