दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
दहिवडी पोलीस ठाण्यांचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे स्वीकारणार पदभार. अक्षय सोनवणे हे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत होते. त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे अंकित बरड पोलीस दूरक्षेत्रांचा ते पदभार सांभाळत होते. त्यांनी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या समवेत व आपल्या पोलीस सहकाऱ्यांसमवेत फलटण ग्रामीण हद्दीमध्ये जीवाची परवा न करता सराईत गुन्हेगारांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. त्यांनी गणेशोत्सवांच्या काळामध्ये फलटण ग्रामीण हद्दीमध्ये धुमाळवाडी येथे भर पावसात जीवाची परवा न करता आरोपींचा पाठलाग करुन आरोपींना पकडण्यांत ते यशस्वी झाले होते. अक्षय सोनवणे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच पोलीस प्रशासन विभागांमध्ये ओळख आहे. सोनवणे हे मूळचे पुणे जिल्ह्यांतील आहेत. तर दहिवडी पोलीस ठाण्यांचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांनी गेल्या वर्षी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्याकडूंन दहिवडी पोलीस ठाण्यांचा पदभार हाती घेतला होता. श्री. तासगांवकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून दहिवडी हे माण तालुक्यांतील एकमेव ठिकाण असल्यांने त्यांनी अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले होते. तसेच दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशासकीय कार्यालय असल्यांमुळे नेहमीच माण तालुक्यांतील ग्रामीण भागातील लोकांची रहदारी असते. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. तासगांवकर यांनी वाहतुकीबाबत त्यांनी चांगलाच निर्णय घेतला होता. यामुळे दहिवडीकरांना वाहतुकीची शिस्त चांगलीच वाहन चालकांना लागली होती. त्यांच्या या निर्णयांला दहिवडीकरांनी सुद्धा चांगलाच प्रतिसाद दिला होता. शिवाय त्यांनी अनेक आपल्या कार्यकाळामध्ये दहिवडी पोलीस ठाण्यांमध्ये आपल्या पोलीस सहकाऱ्यांसमवेत अनेक गुन्हे उघडकीस आणले. बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्या आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यांत आली. तर त्यांच्या जागी नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अक्षय सोनवणे यांची नियुक्ती करण्यांत आली. यावेळी जिल्हास्तरीय पत्रकार म्हणून परिचित असणारे श्री.पुरीगोसावी यांनी अक्षय सोनवणे यांचे जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी या सर्वांच्या वतीने सोनवणे साहेबांचे सोशल मीडियावरुन त्यांचे अभिनंदन व त्यांना शुभेच्छा देण्यांत आल्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांचे सुद्धा जिल्हा विशेष शाखेमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल श्री. पुरीगोसावी यांनी सोशल मीडियावरुन अभिनंदन केले.