दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-काँग्रेस पक्षात अंतर्गत निवडणूक सुरू असून अमरावती जिल्ह्यातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी माजी आमदार यांचे जेष्ठ सुपुत्र विदर्भकुमार शंकरराव बोबडे यांची निवड करण्यात आली.
विदर्भकुमार बोबडे हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असून ते अगोदर शहानुर साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक सुद्धा होते.त्यांचे वडील हे दर्यापूर मतदार संघाचे आमदार,आई नगराध्यक्ष व भाऊ आदेशाकुमार बोबडे हे सुद्धा अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते.त्यांच्या घराणेशाहीचा हा राजकीय कार्यकाळ अत्यंत सुखदायी असतांना वडील शंकरराव बोबडे व भाऊ आदेशकुमार बोबडे यांच्या निधनामुळे बोबडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.आता वडील व भाऊ यांची राजकिय उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने त्यांच्यावर प्रदेश सदस्याचा कार्यभार सोपवला.एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व व बोबडे कुटूंबातील राजकीय उणीव भरून काढण्यासाठी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख,आमदार श्रीमती यशोमती ठाकूर,आमदार बळवंत वानखडे,तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू,शहराध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या सहकार्याने व आशीर्वादाने मी इथवर पोहचलो असे काँग्रेस कमिटी सदस्य विदर्भकुमार बोबडे या सत्कार समारंभ प्रसंगी म्हणाले.
तसेच या सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस बॉईज अंतर्गत होमगार्ड संघर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष मा.निलेशजी पगारे यांनी पत्रकार श्रीकांत नाथे यांची होमगार्ड संघर्ष समिती अमरावती जिल्हाध्यक्ष पदी निवड केली त्याबद्दल काँग्रेसचे प्रदेश सदस्य विदर्भकुमार बोबडे व शहराध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी पत्रकार श्रीकांत नाथे यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विदर्भकुमार बोबडे हे आपल्या राहत्या अंजनगाव सुर्जी क्षेत्रात पोहचताच मोठ्या धुमधडाक्यात त्यांचे स्वागत त्यांच्या मित्र परिवारांनी केले व त्यांना महाराष्ट्र काँग्रेस कमिटी च्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्ते व मित्र परिवारांनी आनंदाचा क्षण साजरा करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप देशमुख,तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू,समाज प्रबोधक राजेंद्र भुडेकार,समता परिषद जिल्हाध्यक्ष विपुल नाथे,आशिष धांडे,रमेशराव नवले,विनायकराव गणगणे,मनोहरराव तारेकर,माहुलकर गुरुजी,शिवदासजी यावले,जहिर बेग,अ.कलीम,गिरीश लोकरे,निलेश ढगे,प्रदीप अडगोकर,धीरज काळे,अनिल टांक,संजय चव्हाण,सुनील अळसपूरकर,विजय काळे,पद्माकर मेन,जगदीश ठाकरे,अनिल लोणकर,शिवा तिखिले,शरद ठाकरे,सुधाकर मेन,आपचे कार्यकर्ते स्वप्निल ढोले,जितू श्रीवास्तव,अमजदभाई,अतुल हाडोळे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष मनिष मेन आदी मान्यवर उपस्थित होते.