दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठात हिंगोली जिल्ह्यातील कलमनुरी चे तसेच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मठाधिपती श्री.जितेंद्रनाथ महाराज यांच्या दर्शनाकरिता आले होते.दर्शन करून मठातून निघाले असता नेहरू चौक येथे उपस्थित असणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबाद,पन्नास खोके एकदम ओके,संतोष बांगर गद्दार है अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आमदार संतोष बांगर यांना शिवीगाळ करून त्यांच्या वाहनांवर थापा मारल्या व जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे अंजनगाव सुर्जी शहरात एकच खळबळ उडाली.ह्यावेळी त्यांच्यासोबत दर्यापूर येथील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपाल अरबट,मुन्ना ईसोकार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसैनिकांनी अचानक आमदार बांगर यांच्यावर वाहनावर हल्ला चढविल्याने बांगर यांनी काढता पाय घेत अमरावती कडे रवाना झाले.