दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : 2014 ला राज्यस्तरावर ही चर्चा झाली होती. त्यावेळी मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे हे आमच्याकडे प्रस्ताव घेऊन आले होते. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीची भूमिका समोर येऊ शकली नाही आणि त्यामुळे चर्चा पुढे होऊ शकले नाही. परंतु ही चर्चा राज्यस्तरावर झाली होती आणि अशोक चव्हाण जे सांगतात ते अगदी खरं आहे. त्यावेळी पवार साहेबांची ही भूमिका मला समजली नाही आणि त्यामुळे तो प्रस्ताव तिथेच राहिला असे माणिकराव ठाकरे म्हणाले. 2014 ला काही शिवसेनेचे आमदार काँग्रेसमध्ये येणार अशी काही चर्चा नव्हती. परंतु शिवसेनेचा प्रस्ताव मात्र काँग्रेसकडे आलेला होता आणि मी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यावेळी चर्चाही झाली होती. ती चर्चा प्राथमिक स्वरूपात होत असल्याचे असं माणिकराव ठाकरे म्हणाले आहेत.