दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- स्थानिक सावता माळी चौक,माळीपूरा,सुर्जी अंजनगाव येथे दुर्गोत्सवानिमित्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.करोना महामारी नंतर धुमधड्याक्यात उत्सव साजरे होत असताना सामाजिक कार्यात सुद्धा गणेशोत्सव आणि आता नवरात्रोत्सवात विविध रोगनिदान,रक्तदान,शालेय स्पर्धा घेऊन या उत्सवांची शोभा वाढत आहे.
झटपट सार्वजनिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या रोगनिदान शिबिरामध्ये जवळपास २०० रुग्णांनी आपली शाररिक चाचणी करून घेतली व उपस्थित तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने पुढील औषधोपचार घेतले.तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये हृदय विकार तज्ज्ञ डॉ.अक्षय ढोरे,अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.संग्राम देशमुख,एन्डोक्रायनयलॉजिस्ट डॉ.राहुल मोपारी,किडनी रोग तज्ज्ञ डॉ.स्वप्नील मोलके,स्त्री रोगतज्ञ डॉ.प्रियंका अभिलाष कविटकर(अंजनकर),डॉ.शंतनू नागपूरकर आदी मंडळी उपस्थित होते.शुगर,लिपिड टेस्ट, Hba1c, Uric acid CBC इत्यादी चाचणी चा रुग्णांनी मोफत लाभ घेतला आहे.
या कार्यक्रमासाठी श्री.कुंदन झाडे व डॉ.कविटकर यांचे मार्गदर्शन लाभले असून तथा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटपट मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.