दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनीधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड– शहरातील नामांकित समजले जाणारे श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर व नवीन कौठा नांदेड या शैक्षणिक कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव अपसुकच सर्वांच्या ओठावर येते. याच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम तथा कौशल्या दिष्ठीत उपक्रम राबवले जातात त्याच अनुषंगाने श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर व नवीन कौठा नांदेड मध्ये कला , वाणिज्य व विज्ञान शाखेत जवळपास दीड हजार विद्यार्थी संख्या असून या दीड हजार विद्यार्थी संख्येचे सर्व क्षेत्रीय व सर्वांगीन समुपदेशन व्हावे या दृष्टिकोनातून कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड तसेच पर्यवेक्षक माधव ब्याळे परीक्षा विभाग प्रमुख प्रा. स्वाती कान्हेगावकर , स्वच्छता विभाग प्रमुख मुरलीधर घोरबांड सांस्कृतिक विभाग प्रमुख कैलास पतंगे या दिग्गज मान्यवरांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीनुसार कनिष्ठ महाविद्यालय माणिक नगर व कनिष्ठ महाविद्यालय नवीन कौठा नांदेड येथे समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले..
माणिक नगर शाखेत समुपदेशन कार्यक्रमासाठी पोलीस कॉन्स्टेबल ज्योती गायकवाड तसेच मराठवाडा वृत्तपत्राचे उपसंपादक तथा पत्रकार राम तरटे यांनी विद्यार्थ्यांना समुपदेशन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसमोरील समस्या व अडीअडचणीवर मात कसे करावे आणि ध्येयप्राप्ती साठी व ध्येयापर्यंत कसे जाऊन पोहोचावे यावर सखोल मार्गदर्शन वरील दोन्ही मान्यवरांनी केले. एवढेच नव्हे तर इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक तथा अर्धापूर येथे तहसील कार्यालयात पेशकार म्हणून कर्तव्य बजावत असलेले जी. सिद्धांत यांनी अवघ्या कमी वेळेत हाताच्या दहा बोटावर दहा हजार इंग्रजी शब्द कसे तयार केले जातात व बोलले जातात हे विद्यार्थ्यांसमोर प्रायोगिक तत्त्वावर सादर केले
तसेच श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज नवीन कौठा नांदेड येथे ज्येष्ठ साहित्यिका तथा लेखिका , कवयित्री स्वाती कान्हेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी प्रा.स्वाती कान्हेगावकर यांनी विद्यार्थ्यांना आजची दिशा आणि दशा व यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर अतिशय मार्मिक व मनभेदी विषय विवेचन विद्यार्थ्यांसमोर मांडला यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वची जाणीव होऊन यश प्राप्तीसाठी आपण काय केले पाहिजे अशा प्रकारची भावना विद्यार्थ्यांच्या मनात जागृत झाली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड यांनी भूषविले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती उपाध्यक्ष माननीय सूर्यकांत कावळे तसेच कॉलेजचे प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे , पर्यवेक्षक प्रा. माधव ब्याळे , कौठा इन्चार्ज प्रा. सय्यद जमील , स्वच्छता विभाग प्रमुख मुरलीधर घोरबांड , परीक्षा विभाग प्रमुख प्रा. स्वाती कान्हेगावकर , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.कैलास पतंगे यांची उपस्थिती होती. माणिक नगर शाखेतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश मोरेश्वर यांनी केले तर कौठा शाखेतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा स्वामी संगीता यांनी केले . कार्यक्रमाची सुरुवात प्रा.रुपाली कळसकर यानी वंदे मातरम या गीताने केली तर सांगता राष्ट्रगीताने झाली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॉलेजच्या सर्वच प्राध्यापक तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले प्रसंगी या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित होते.