दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनीधी- प्रा यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड मध्ये इयत्ता बारावी कला ‘ अ ‘ तुकडी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कुमारी दुर्गा दंडवते या सर्वसाधारण कुटुंबात जन्मास आलेल्या विद्यार्थिनीचा वाढदिवस आज कॉलेज प्रशासनाच्या वतीने भौतिकशास्त्र लॅब मध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी ती विद्यार्थिनी मूळची सांगवी येथील रहिवासी असून घरची परिस्थिती मध्यमवर्गीय असून शैक्षणिक दृष्ट्या होतकरू असलेली दुर्गा दंडवते हीस वर्ग शिक्षक प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव यांनी दिलेल्या पूर्वकल्पनेनुसार कॉलेजचे प्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक प्राध्यापक माधव ब्याळे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा.स्वाती कान्हेगावकर , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक कैलास पतंगे , प्रयोगशाळा सहाय्यक श्री बालाजी निरपणे यांच्यामध्ये दुर्गा दंडवते या विद्यार्थिनीच्या शैक्षणिक तळमळीचा व होतकरू पाण्याचा विचार करून तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दुर्गा दंडवते हीच श्री बालाजी निरपणे सर यांच्या वतीने उपप्राचार्य परशुराम येसलवाड सर यांच्या शुभ हस्ते शैक्षणिक साहित्य व युनिफॉर्म देऊन होतकरू विद्यार्थिनीचा वाढदिवस सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक मंडळीच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला तसेच त्या विद्यार्थिनीस मायेची उब देण्याचे कार्य प्रशासनाच्या वतीने व बालाजी निरपने यांच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका तथा लेखिका व परीक्षा विभाग प्रमुख स्वाती कानेगावकर यांनी इयत्ता बारावी वर्गात शिकत असलेल्या दुर्गा दंडवते या विद्यार्थिनीची बारावी बोर्ड परीक्षा फीस भरण्याची जबाबदारी घेऊन तिला आशीर्वादरूपी आश्वासन दिले. व भावी वाटचालीस मनस्वी शुभेच्छा देऊन वाढदिवसानिमित्ताने तिचे अभिष्टचिंतन केले.
हीच श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड शाखेची विद्यार्थ्यांप्रती असलेली अस्धा ,माया आपुलकी , जिव्हाळा व प्रेम विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक प्राध्यापक व प्राध्यापिका यांच्या मनात असलेली संवेदनशीलता ममतेने लोतपोत झालेली दिसून येते व गोरगरीब लेकरांना मदतीचा हात देऊन त्यांना समाजात ताठ मानेने वागण्यासाठी कणखर बाण्याने समाजात वावरण्यासाठी सक्षमपणे तयार केले जाते.
यावेळी कॉलेजचे सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याप्रसंगी कुमारी दुर्गा दंडवते या विद्यार्थिनींच्या वतीने कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड आणि परीक्षा विभाग प्रमुख स्वाती कान्हेगावकर आणि प्रयोगशाळा सहाय्यक बालाजी निरपणे सर यांचे मनापासून आभार मानले.