दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेचे सेनापती क्रांतिअग्रणी डॉ जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कै. विजया(काकू) लाड उद्यानाचे कुंडल येथे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित राहून या थोर क्रांतीवीरांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.
यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, आमदार सुमनताई आर आर पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, शरद लाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
सांगली परिसरात आले की स्व. आर आर. आबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्यासारखे कतृत्ववान लोक या भागात होऊन गेले.ही भूमी पवित्र आहे.
याच कार्यक्रमात आशा वर्कर यांना सायकल वितरण करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित महिला मेळाव्यास मार्गदर्शन केले. आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. या काळात त्यांनी जनजागृती बरोबरच जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली. या काळात आशा सेविकांना देखील कोरोना झाला पण त्यांनी सेवाभाव सोडला नाही.
आशा सेविकांची सध्या एक मागणी आहे की आम्हाला मानधन नको वेतन हवे आहे. या प्रश्नाकडे राजकीय नजरेतून न पाहता यावर सविस्तर चर्चा व्हायला हवी. आशा सेविकांची मागणी अतिशय रास्त आहे. त्यामुळे या मागणीचा विचार होणे गरजेचे आहे.
महाविकास आघाडीने महिलांच्या सन्मानासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा चांगला निर्णय घेतला. कारण महिला सन्मान ही आपली संस्कृती आहे. महिला आरक्षणामुळे आज अनेक क्षेत्रात महिला कर्तृत्व दाखवत आहेत. ही फार अभिमानाची गोष्ट आहे.
अरुणअण्णा लाड यांनी नेहमीच जनतेची सेवा केली आहे. पाच जिल्ह्याचे आमदार असूनही त्यांनी निराधार कुटुंबाना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, स्थानिक नागरीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.