दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती रविवारी जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, राजकीय पक्षातर्फे साजरी करण्यात आली. शहर काँग्रेस कमिटी भूम येथे काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रुपेश शेंडगे ,विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता तांबे, विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज सय्यद, जिल्हा ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष प्रभाकर डोंबाळे ,काँग्रेसचे अध्यक्ष राजू साठे ,कोहिनूर सय्यद ,तनवीर मोगल आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.