दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
जि सातारा. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये आय पी.सी कलम प्रमाणे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींनी फलटण ग्रामीण पोलिसांना चांगलाच गेले वर्षभरांपासून गुगारा देत होते. दोन दिवसांपूर्वी सदर आरोपी हे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील सांगवी या गावांमध्ये येणार असल्यांची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाली. आरोपीच्या शोधासाठी फलटण ग्रामीणच्या दबंग महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांसमवेत सांगवी गावात धाव घेतली. तेथेही आरोपींना पोलीस आलयांची चांगली चाहूल लागली होती. आरोपीने तिथूनही धूम ठोकण्यांचा चांगलाच प्रयत्न आखला होता.दोन्ही आरोपी तेथील असणाऱ्या उसांच्या शेतामधून पळून जाण्यांचा प्रयत्न करीत असताना. सपोनि एस.बी भोसले आणि महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे यांनी जवळपास आपल्या पोलीस सगळ्यांसमवेत वेशांतर करुन आरोपींच्या जवळपास दोन कि.मी. पाठलाग करून आणि भर पावसामध्ये अत्यंत शिताफिने आरोपींच्या मुसक्या आवडण्यांत दबंग महिला पोलीस अधिकारी स्वाती धोंगडे यांचे पोलीस सहकार्यी यशस्वी ठरले. त्यांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस प्रशासनाकडूंन व परिसरांतून सर्वत्र कौतुक होत आहे. (कुमार धर्मा पवार व अमोल धर्मा पवार) रा. आसू ता. फलटण जि.सातारा) ताब्यांत घेण्यांत आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे,उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरर्डे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एस.बी भोसले, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती. स्वाती धोंगडे, सहा.पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी पोलीस हवा. हंगे पो.कॉ निखिल गायकवाड पो.कॉ गणेश अवघडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.