दैनिक चालू वार्ता संभाजी- गोसावी प्रतिनिधी
रायगड.
जम्मू काश्मीरमधील दुर्गम भागांतील सीमेवर देशसेवा करीत असताना रायगड जिल्ह्यांतील जवानाला काश्मीर सीमेवर देशाचे संरक्षण करीत असताना वीरमरण आले महाड येथील राहुल आनंद भागात (वय 28) असे शहीद झालेल्या जवानांचे नाव आहे. राहुल यांच्या मागे आई-वडील भाऊ-बहीण पत्नी व एक लहान मुलगा असा त्याचा परिवार होता. राहुल यांच्या पत्नी आणि आपल्या मुलासह या ठाण्यांमध्ये वास्तव्यास होत्या. तर आई,वडील भाऊ इसांने कांबळे येथे गावी वास्तव्यास होते. २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त देशभरांत पाळण्यांत येणाऱ्या अहिंसा दिनादिवशीच राहुल भगत यांना वीरमरणग्रती प्राप्त झाली. जम्मू काश्मीरमधील दुर्गम भागांतील सीमेवर कार्यरत असणाऱ्या रायगड जिल्ह्यांतील महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावांतील जवान राहुल आनंद भागत पराकियाबरोबर मुकाबला करीत असताना रविवारी सायंकाळी वयाच्या 28 व्या वर्षी ते शहीद झाल्यांची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.