दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचा वाद उच्च न्यायालयात गेला होता. महाराष्ट्राचं राजकारण मागील काही दिवसांपासून दसरा मेळाव्याभोवती फिरत आहे.
अखेर शिंदे गटाने दसरा मेळावा बीकेसीवर घेण्याचं नाईलाजाने मान्य केलं. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे होणार असून उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे.
या मेळाव्यांना गर्दी जमविण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत असून एकमेकांवर हल्लाबोल करत आहे. या वादामध्ये राष्ट्रवादी उडी घेत असल्याची चर्चा असतानाच शरद पवारांनी आता शिंदे आणि ठाकरे दोघांनाही सुनावलं आहे. याशिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांविषयीही त्यांनी भाष्य केलं होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे गटावर निशाना साधला आहे.
त्यांनी ट्विट करत म्हणाले आहेत की “गद्दारांचे.. प्रेम झाले सुरत मध्ये, हनिमून झाला गुवाहाटी मध्ये पोटात कळ आली गोवा मध्ये…. मग मी म्हणतो, लाचारांचा दसरा मेळावा महाराष्ट्रात का? असं ट्विटमध्ये म्हणाले आहेत. यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान दरसा मेळावे येत्या बुधवारी होणार आहेत. शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा मेळावा BKC वर होणार आहे.