दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-गोरख चौरे
पुणे– – ब्लड कॅन्सर वरील एक केमो करण्यासाठी दोन लाख रुपयांचे इंजेक्शन लागतात. सौ मंगल कांबळे यांचा हाता तोंडाशी आलेला मुलगा. आदेश कांबळे त्याचं नाव वय अवघे 24 वर्षे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर केमोथेरपी सुरू आहे. आदेश ला ब्लड कॅन्सर झालाय. पहिला केमो पुणे महानगरपालिकेच्या मदतीने सक्सेस झाला. दुसऱ्या केमोसाठी सगळ्या संस्थांकडे आदेश कांबळे यांची आई मंगल कांबळे जाऊन आल्या. कुठेच दाद मिळाली नाही. मी आज हेच “Nivolumab – 200ml” इंजेक्शन मुंबईतून मागवलं. इंजेक्शनचे फोटोही काढले. 100 मिली इंजेक्शन 99 हजार 500 रुपयांना आहे. अशी दोन इंजेक्शन त्यांच्या ताब्यात दिली.
सुरुवातीला काम करताना आम्ही ज्यांना मदत केली त्यांच्याकडून आभार पत्र घेत होतो. ती आभार पत्र घेताना फोटो काढून, सोशल मीडियावर प्रसारित करत होतो. पुढे रोज रोज पत्र पोस्ट करण्याचा फोटो काढण्याचा कंटाळा येऊ लागला. आज दोन दिवसात जी काय बदनामी सुरू आहे. रुग्ण हक्क परिषद संघटनेची बदनामी जोरात सुरू आहे. रुग्ण हक्क परिषद बंद झाली तर आदेश कांबळे सारख्या लोकांचे जीव वाचतील का? उद्या त्याचा दोन लाख रुपयांचे इंजेक्शनचा ब्लड कॅन्सर वरील केमो दीनानाथ मंगेशकर ला होईल. पैसे नाहीत म्हणून दोन दिवस इंजेक्शन साठी उशीर झाला आहे मात्र काहीही होणार नाही, यशला काळजी करण्याची काही गरज नाही असे त्याचे डॉक्टर अभिजीत माहिती म्हणाले आहेत.
आदेश कांबळे दीर्घायुषी होईल, याबद्दल मला कींचीतही शंका नाही. आदेश ला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा सांगा असा निरोप मी त्याची आई मंगल कांबळे यांच्याकडे दिलाय.
– उमेश चव्हाण, अध्यक्ष – रुग्ण हक्क परिषद, महाराष्ट्र प्रदेश