दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपुर:- अहमदपुर शहरातील फुले नगर येथील दुर्गा माता नवरात्र महोत्सवात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आरतीचे आयोजन करुन साप्ताहिक विवेकचा हिंदुत्व ग्रंथाची नोंदणी शुल्क भरून सभासदांच्या हस्ते दुर्गा देवीची आरती करण्यात आली.
सदरील महोत्सवात विवेक अंकाचे वितरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नवरात्र महोत्सव समिती अध्यक्ष, गोविंद हिवरे, उपाध्यक्ष सुशांत गुणाले व सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते अदीशक्ती दुर्गा देवीची आरती करून त्यांच्या हस्ते सर्व विवेक सप्ताहीक सभासद बांधवाचा विवेक अंक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी विवेक हे समाजजागृती ,देशप्रेम विचारप्रबोधन करणारे साप्ताहीक आहे त्यासाठी सर्वानी सहकार्य केले पाहीजे असे आवाहन माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी यानी केले.
सदरील कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर सर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, भाजपा नेते ज्ञानोबा बड़गिरे, चंद्रशेखर डांगे, नगर सेवक राहुल शिवपूजे , इंजिनिअर अनिलजी फुलारी, प्रा. सुनील मजगे , बबन आरदवाड, कुमार चव्हान, संतोष मद्देवाड, काशीनाथ भालके, अश्विन आंधळे, मुन्ना अय्या,गणेश बेंबळकर, शिवानंद भोसले, माधव शेटकार, राम अलगुले, गणेश हालसे, अँड किशोर कोरे , अँड.निखिल कासनाळे, गंगाधर हेंगने, आशीष हेंगने, सतीश मद्देवाड , गुणाजी भगत, कृष्णा कोटगिरे,यतिन पटेल,सुरेश जगताप, सुनील हालसे , प्रज्वल बुलबुले, दीपक हालसे यांच्या सह दुर्गा माता नवरात्र महोत्सवाचे पदाधिकारी व फुले नगर मधील भावनीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थिति होते.