दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व यु. वि. टी. महाविद्यालय, सगरोळी येथे आयोजित आंतर महाविद्यालयीन विद्यापीठीय जलतरण स्पर्धेत देगलूर महाविद्यालयातील श्री. संगमकर उमाकांत या खेळाडूने 400 मी आई. एम. मध्ये सुवर्ण पदक पटकावत 400 मी फ्रिस्टाईल मध्ये रौप्य पदक तर 200 मी फ्रिस्टाईल कांस्य पदक प्राप्त झाले तसेच श्री कोंड्यालाडी बालाजी हा 200 मी बटरफ्लाई मध्ये रौप्यपदक तर श्री. दूडलवार विठ्ठल हा 50 मी फ्रिस्टाईल मध्ये कांस्य पदक पटकावले आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ. निरजकुमार उपलंचवार व प्रा. वावधाने दीपक, प्रा. सिताराम हाके यांचे मार्गदर्शन लाभले असून यांचे अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, संस्थेचे सचिव शशिकांत चिद्रावार, उपाध्यक्ष श्री नारायणरावमैलागीरे, सहसचिव श्री सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उग्रतवार, देवेंद्र मोतेवार, श्री गंगाधर जोशी, श्री जनार्दन चिद्रावार, श्री रवींद्र अप्पा घाडे. चंद्रकांत नारलावार, प्राचार्य डॉ. मोहन खताळ व उप प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, लोकप्रशासन विभागप्रमुख व प्रसिद्धी प्रमुख डॉ. बी. आर. कतुरवार, पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी यांनी आभिनंदन केले आहे.