दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
पंढरपूर. कोल्हापुरांतील एका तालीम कुस्तीचा सराव करीत असताना पंढरपूर येथील वाखरी गावचे सुपुत्र मारुती सुरवसे (वय२३) वर्षाच्या पैलवानाचा काल सायंकाळी मृत्यू झाल्यांची दुर्दैवी घटना घडली. गेले काही वर्षापासून सुरवसे हा कोल्हापुरातील तालीम कुस्तीचा सराव करीत होता. काल सकाळी तालीम कुस्तीचा सराव करुन आंघोळ करीत असताना अचानक छातीत दुखू लागल्यांने त्याला रुग्णालयांत दाखल करण्यांत आले. पण उपचारा दरम्यान त्याचा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीची चांगलीच आवड होती. कुस्तीमध्ये करिअर करायची त्याला कोल्हापूर येथील तालीम कुस्तीच्या सरावासाठी पाठविण्यांत आली होते. मारुतीचे वडील हे वाखरी या ठिकाणी शेती व्यवसाय करतात. त्याच्या निधनांमुळे कुस्ती क्षेत्रांमध्ये तसेच पंढरपूर वाखरी गावावर शोककळा पसरली सदर घटनेबाबत वाखरी गावचे पोलीस पाटील यांनी माहिती दिली.