दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरात दि. ७-१०-२०२२ रोजी आझाद ग्रुपचे लोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांच्या वाढदिवसानिमित आझाद ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यात जुना लोहा येथे श्री संत गोरोबा काका मंदिराच्या प्रांगणात सकाळी ९ वाजता भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात प्रथम पारितोषिक २१०० रूपये व सन्मान चिन्ह आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या वतीने तर दित्तीय पारितोषिक ११०० रुपये व सन्मान चिन्ह आझाद ग्रुपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिपक रायफळे यांच्या वतीने व तृतीय पारितोषिक ५०१ रुपये व सन्मान चिन्ह आझाद ग्रुपचे आझाद ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे यांच्या वतीने
ठेवण्यात आले आहे.
तसेच सकाळी ११ वाजता लोहा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आझाद ग्रुपचे मराठवाडा संघटक तथा लांडगेवाडीचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब टोपारे यांच्या वतीने ठेवण्यात आला आहे. तसेच दुपारी १२ वाजता आदर्श शिक्षक विनोद पाटील गवते यांच्या वतीने डॉ. हेलन केलर अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात येणार आहे
तसेच सायंकाळी ७ वाजता जुना लोहा येथील श्री संत गोरोबा काका मंदिराच्या प्रांगणात आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य अभिष्टचिंतन सोहळा व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तेव्हा या कार्यक्रमाला सर्व जनतेनी उपस्थित रहावे असे आवाहन आझाद ग्रुप लोहा तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.