दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर :- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मचळवळ समता,बंधूता आणी न्यायाच्या मूल्यावर अधारीत असून आता विशेषतः युवकांनी धम्म चळवळ गतीमान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आग्रही प्रतिपादन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.
शहरातील भीम नगर,बौध्द नगर,मरशिवनी,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर अशा विविध ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार म्हणाले की,आज युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या व्यसनामूळे संपूर्ण तरूणाई भरकटतेय की काय अशी अवस्था निर्माण होत असून या व्यसनांचा विळखा तरुणाईवर होत आहे.या व्यसनापासून दूर जाण्यासाठी स्वतःला धम्मकार्यात झोकून द्यावे.ही धम्म चळवळ गतीमान करण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या बावीस प्रतिज्ञांचे,पंचशिलाचे पालन करावे असे अवाहन केले.
कार्यक्रमाच्या सूरूवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध आणी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूष्प धूप दीप याने पुजा करून अभिवादन केले.तसेच पंचशिल ध्वजाचे अनावरण करण्यात आले.सामूहीक त्रिशरण पंचशिल घेवून सर्वांत शेवटी सरणतय गाथेनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या वेळी भीमनगर येथील कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष अँड.भारतभाऊ चामे,पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, एम.एन.ससाणे,प्राचार्य एम.बी.वाघमारे,प्रा.डाॅ.सतिश ससाणे,महेंद्र ससाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.तथागत बौध्द विहार बौध्द नगर येथे प्रा.डाॅ सतिश ससाणे, सरपंच जवळगेकर,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, शरद बनसोडे, प्रकाश नवरंगे,संगमेश्वर बनसोडे, अनिल तिगोटे, सिध्दार्थ वाघमारे, कदम मिस्त्री, बालाजीराव वाघमारे, शिवाजीराव भालेराव, सोनकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.तर मरशिवनी येथे माजी नगरसेवक संजय गूणाले, एम.एन.ससाणे,हनमंते,लामतूरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.