दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे, दि.६ : जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेच्या जिल्हास्तरीय संकल्पनांचे सादरीकरण सत्र १४ ऑक्टोबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आले आहे.
या सत्रात नावीन्यता तसेच उद्योजकतेबाबत माहिती देण्यात येणार आहे असून https://msins.in/ या वेबपोर्टलद्वारे नोंदणी केलेले उमेदवार जिल्हास्तरीय संकल्पना सादरीकरण सत्राकरिता पात्र ठरणार आहेत. नव्याने इच्छुक उमेदवार देखील या वेबपोर्टलदवारे नोंदणी करु शकणार आहेत.
जिल्हास्तरीय सादरीकरणातून ३ विजेते निवडण्यात येणार असून ते राज्यस्तरीय सादरीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. सादरीकरणाद्वारे समोर येणाऱ्या नावीन्यपूर्ण संकल्पना विचारात घेऊन जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रामधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी नवउद्योजकतेच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सा.बा.मोहिते यांनी केले आहे.