दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- रिध्दीका कर्हाळे ची कांस्यपदकावर गरुड झेप आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या परीक्षेत कु. रिध्दीका रमेश कर्हाळे हिला कांस्य पदक मिळाले आहे त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे. संजय गांधी हायस्कूल येथील चित्रकला शिक्षक रमेश कर्हाळे यांची मुलगी असून तिने वडिलांचे चित्रकलेचे ज्ञान हस्तगत केले असून वडिलांचे नाव व वसेकर चित्रकला महाविद्यालयाचे नाव संपूर्ण भारतात गाजविले आहे, आणि त्यांच्या कष्टाला फळ मिळाले असून तिने जीवनाचे सोने केले असून, आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत कांस्य पदक मिळविणारी नांदेड जिल्हातून एकमेव मुलगी असून तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.