दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
…देगलूर तालुक्यातील चैनपुर येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व पालकांच्या सहमतीने अतिशय सुज्ञ अशा पालकांची निवड चैनपुर शालेय व्यवस्थापन समितीमध्ये करण्यात आली. त्याप्रसंगी केंद्रप्रमुख श्री केशवे सर व मुख्याध्यापक, पाटील सर व पर्यवेक्षक साबणे सर हे कार्य पार पाडत होते चैनपुर एक शैक्षणिक केंद्र असून अतिशय शैक्षणिक दृष्ट्या पोषक वातावरण या चैनपुर नगरीला लाभलेली असून पंचक्रोशी मध्ये चैनपूर येथे जिल्हा परिषद शाळेचे भव्य इमारत असून नैसर्गिक पटांगण आहे. या ठिकाणी शालेय समितीच्या अध्यक्षपदी लालू भीमराव बोरवाड यांची उपाध्यक्षपदी विजय सायन्ना कोमुलवार यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. हे दोन्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, कांग्रेस कार्यकर्ते हणेगावे मारोतीराव यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अतिशय शैक्षणिक जागरूक अशा पालकांची निवड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवड करण्यात आल्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.