दैनिक चालु वार्ता वृतसेवा-
पुणे दि. पुणे सोलापूर रोड वरील उरुळी कांचन येथे मुस्लिम बांधवांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणजे ईद-ए-मिलाप दिनानिमित्त उरुळी कांचन येथील सामाजिक युवा कार्यकर्ते शोएब भाई मणियार यांनी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते
संध्याकाळी सात वाजता बाजार मैदान येथून सामाजिक युवा कार्यकर्ते शोएब भाई मनियार यांच्या नेतृत्वाखाली बाजार मैदान येथून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला सटवाई चौक ग्रामपंचायत चौक शिवाजी चौक गांधी रोड तळवाडी चौक पुणे सोलापूर रोड बस स्टॉप डॉ आंबेडकर चौक आश्रम चौक मिरवणूक निघत असताना या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत होते तर अनेक घटकांच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीचे जंगी स्वागत केले अन्नदान फळ वाटप शरबत वाटप मिठाईवाटप ही यावेळी वाटण्यात आलीआणि मिरवणुकीच्या दर्शनी भागासमोर हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी आपल्या हातात राष्ट्रीय ध्वज तिरंगा घेऊन मिरवणूक मार्गस्थ पुढे जात होती जामा मस्जिद येथे मिरवणुकीचे विसर्जन एका कार्यक्रमात करण्यात आले
राजेंद्र कांचन (सरपंच) युवराज कांचन (उपसरपंच) अलंकार कांचन पाटील (तंडा मुक्ती अध्यक्ष) पंडित भाऊ दाभाडे (बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष) सामाजिक युवा कार्यकर्ते शोएब मनियार यांच्यासह अनेक मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी श्रीकांत मेमाणे (शिवसेना नेते) प्रा भाऊसाहेब शिंदे (बहुजन जनता दल पुणे जिल्हा उपाध्यक्ष )वसंत डेढे . (बहुजन रिपब्लिकन सेना) खरील शेख फरहान भाई मनियार अजित शेख आईजासत्ताक मणियार ताहीर तांबोळी सुलतान सय्यद अमन मनियार मौला शेख यांच्यासह गावातील सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रा भाऊसाहेब शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सामाजिक युवा कार्यकर्ते शोएब मनियार यांनी केले यावेळी उरुळी कांचन पोलीस अधीक्षक चव्हाण साहेबांनी पोलिसांचा कडक बंदोबस्त करुन सहकार्य केले असे कार्यक्रमाचे आयोजक आणि सामाजिक युवा कार्यकर्ते शोएब मनियार यांनी कळविले आहे