दैनिक चालु वार्ता फुलवळ सर्कल प्रतिनिधी -नरसिंग पेठकर
कंधार तालुक्यातील फुळवळ येथील भारतीय सैन्य दलातील जवान परमेश्वर आमलापुरे हे 18 वर्षाची देश सेवा करून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर जन्म भूमीत परतलेल्या या जवानाचे प्रविण पाटील मंगनाळे मित्र मंडळाच्या आयोजनाखाली फुलवल येथे जंगी स्वागत करण्यात आले.
फुलवळ येथील महात्मा बसवेश्वर चौकापासून मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी या जवानाचे स्वागत करण्यात आले. कै दिगंबर पटने सांस्कृतिक सभागृहामध्ये सेवानिवृत्त जवान परमेश्वर अमलापुरे यांचा सह पत्नी भव्य नागरी सत्कार करण्यात आला. वर्ग मित्रांनी देखील या जवानाचा सह पत्नी सत्कार केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे होते,सोबत माजी सरपंच बालाजी देवकांबळे, ग्रा.प. सदस्य प्रविण पाटील मंगनाळे, श्रीकांत मंगनाळे, रहीम शेख, देवीदास फुलवळे ,तंटामुक्तीअध्यक्ष डी. टि. मंगनाळे,होनाजी शेळगावे, भुजंग मंगनाळे, सलीम शेख, पोलीस पाटील इरबा देवकांबळे,दिलीप मंगनाळे,संदीप मंगनाळे, नीलकंठ मंगनाळे,खदीर मोमीन,विकिल मंगनाळे,मारोती फुलवळे, अंकेत मंगनाळे ,औमकार डांगे,गोटू मंगनाळे, धोंडिबा फुलवळे, पत्रकार बांधवा सह गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुकाराम भुजबळ, संतोष मंगनाळे तसेच या कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण पाटील मंगनाळे मित्र मंडळ आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत मंगनाळे, रामलिंग महाराज मठपती, यांनी केले तर प्रविण पाटील मंगनाळे यांनी उपस्थित सर्व गावकरी मंडळीचे आभार मानले.