दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
_____________________
अकोला दि. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वढू बुद्रुक ता शिरूर जि पुणे येथे सन्मान पूर्व अंत्यसंस्कार करणारे आणि त्यांच्या अत्यंत जवळचे समजणारे विश्वासू वढू बुद्रुक येथील वीर योद्धा गोविंदा गोपाल गायकवाड यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे प्रयत्न करीत आहेत
त्यांनी नुकतीच अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे साहेब यांची भेट घेऊन वीर योद्धा गोविंदा गायकवाड राष्ट्रीय स्मारकासाठी वैयक्तिकरित्या मदत करण्याची मागणी केली असता उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे साहेब यांनी वैयक्तिक रित्या मदतीचेआश्वासन दिल्याचे बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे. वीर योद्धा गोविंद गोपाल गायकवाड यांचे वंशज राजमाता श्रीमती अहिल्याबाई राजेंद्र गायकवाड युवराज जयेश राजेंद्र गायकवाड सुरेश गायकवाड रमेश गायकवाड कैलास गायकवाड पांडुरंग गायकवाड यांच्यासह गावातील नागरिकांची भेट घेऊन वीर योद्धा गोविंदा गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा तयार करण्यात आला आहे यामध्ये वीर योद्धा गोविंदा गायकवाड यांच्या वढू बुद्रुक येथील समाधी येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार तर पुणे नगर रोडवरील वढू बुद्रुक फाटा येथे वीर योद्धा गोविंदा गायकवाड प्रवेशद्वार (कमान )उभारण्यात येणार असल्याचेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले
यावेळी वीर योद्धा गोविंद गोपाल गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी अकोला जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे साहेब यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी भेट घेतली यावेळी वीर योद्धा गोविंदा गोपाल गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकाला आपण लवकरच वैयक्तिक रित्या मदत करण्याचे आश्वासन अकोला निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय साहेब यांनी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांना दिले यावेळी संतोष गवई (बहुजन जनता दल अकोला जिल्हा अध्यक्ष) विलास मोरे (बहुजन जनता दल वैद्यकीय कामगार आघाडी अकोला जिल्हाध्यक्ष) रमेश तायडे (बहुजन जनता दल अकोला तालुका अध्यक्ष )के सी बागडे उपस्थितीत होते