दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- महावितरण विभागाला डीपी बसवून पर्यटन स्थळाची शोभा वाढवण्याची मागणी केली.जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांना घेवून सर्व महादेव मंदिर परिसर दाखविला.बळीराजा मंदिराचे बांधकाम चालू असून आमचे कुलदैवत बोरीचा महादेव आहे.या देवाची प्रचिती मला पुर्ण आली असून मला बोरीच्या महादेवाचा आर्शिवाद मला आहे.या महादेवाची ही खासीयत आहे की आपण जर मनोभावे मागीतले तर ते मिळते.या महादेवामुळेच पंचक्रोशीतील कळका,मंगनाळी,कळकावाडी,कागणेवाडी,टोकवाडी,बोरी(बु.),नांवद्याची वाडी हे सर्व गावे आम्ही एकजुटीने राहता.दरवर्षी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला जातो.ह.भ.प.ढोक महाराज,ह.भ.प.शास्त्री महाराज यांचे भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहात यांचे सुश्राव्य वाणीतून भक्तांनी लाभ घेतला आहे तर यावर्षी ह.भ.प चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे कंधार तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी सर्व विभाग उपस्थित राहून परिसरातील नागरिकांना नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन जाग्यावर कामे करून देण्यात आली. यावेळी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब संस्थान अध्यक्ष महादेव मंदिर बोरी बुद्रुक,भाजपा नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर,बोरी महादेव संस्थानचे सचिव श्री बालाजी झुंबाड यांच्यावतीने खासदार साहेब व भाजपा जिल्हा अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री व्यंकटराव पाटील गायकवाड,शिवराज कळकेकर यांनी सुद्धा दोन्ही मान्यवरांचा सत्कार केला.भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव नाईक,श्री बाबुराव केंद्रे भाजपा प्रदेश सदस्य,भाजपा नेते श्री मनोहर पाटील तेलंग कंधार नगरपालिका उपनगराध्यक्ष जफर भाई ,माजी नगरसेवक श्री कृष्णा पापीनवार,भाजपा कंधार तालुका अध्यक्ष श्री भगवान राठोड,कंधार भाजपा ओबीसी अध्यक्ष श्री मधुकर पाये,कंधार पंचायत समिती उपसभापती श्री पंजाबराव पाटील वडजे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री. साईनाथ कोळगीरे,पंचायत समिती सदस्य श्री संजय देशमुख,भाजपा नेते श्री गोविंदराव शिंदे सर,व्यंकटराव लक्ष्मणराव कळकेकर भाजपा शक्ति केंद्र पेठवडज,श्री बालाजी तानाजी पाटील तसेच परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.