दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मंनधरणे
देगलूर :काल दि.12/10/2022 रोजी भोकर,धर्माबाद,बिलोली येथील SDM कार्यालयास जातप्रमाणपत्र संदर्भात मन्नेरवारलू समाज सुधारक मंडळ शिष्टमंडळाने भेट दिली.अनेक समाज बांधवांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रचंड अडचणी आहेत.कुटुंबात वैधता प्रमाणपत्र आहे,१९५० पुरावा आहे,तरीही जातप्रमाणपत्र देत नाहीत. w चे v करायचे आहे तरी बदलून देत नाहीत.स्टेटचे कास्ट काढले तर सेंट्रलचे बदलून देत नाहीत.सेतूवाला प्रस्ताव ऑनलाईन करून घेत नाही.SDM जवळील क्लर्क म्हणजे चहा पेक्षा केटली गरम. SDM पर्यंत तो कोणालाही पोहोचू देत नाही.काहीजण सुपारी घेऊन प्रस्ताव दाबून ठेवले आहेत.काही SDM महोदय स्वतःच्या अधिकारात पत्र काढून अनुसूचित जमातींना 1950 पूर्वीचा जातीचा पुरावा मागतात. काही जण कशाला उचापती करायच्या म्हणून नको त्या तडजोडी करतात.गुपचूप चोर मार्गाने दहा/वीस/तीस/चाळीस/पन्नास/ ऐपतीप्रमाणे आकडे लाऊन काढून घेतात.देव्हाऱ्यातला देव म्हणजे SDM आणि गरजू भक्त,जातभाई यांच्यातील मध्यस्थ,पुरोहित(एजंट)घरपोच प्रमाणपत्राचे दान पोचते करतात.उरलेले इतर जातभाई चुकीच्या दिशेने चकरा मारून बेजार होतात. काही SDM यांच्या डोक्यात आपल्या जमाती बद्दल पक्का पूर्वग्रह ठासून भरलेला आहे.1950 च्या पूर्वीच्या जातीचा पुरावा लागतोच हा त्यांचा आग्रह. मात्र शासन आदेश मागितला तर ते आम्हाला दाखवू शकले नाहीत.1950 चा पुरावा मागू नये असे शासनाचे पत्रक आहे. मात्र त्यांना शासन निर्णय हवा म्हणतात.समिती कडून काढलेले एकनाथ भालेराव यांचे पत्र पूढे करतात.मात्र शासनाचे पत्रक मान्य करत नाहीत.समाजकल्याणचे निर्णय दाखवतात.जे आम्हाला लागू होत नाहीत.अनेक SDM व्यक्तीपरत्वे निकष,नियम राबवत आहेत.आम्ही ठासून आमची बाजू मांडली,युक्तिवाद केला.बऱ्याच प्रमाणात त्यांचा पूर्वग्रह बदलवला…..
*उलगुलान जारी है…..*
सर्वच SDM यांना आम्ही योग्य पद्धतीने भेटणारच आहोत.
आम्ही जमातीची बाजू ठासून व योग्य कागदपत्रे घेऊनच पूढे ऊभे राहत आहोत….कृपया कुणीही चुकीची कागदपत्रे लावू नका…. चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळवू नका….योग्य कागदपत्रे घेऊन ऑनलाईन करा…. प्रमाणपत्रे मिळणे हे कधीच बंद होत नसते. फक्त योग्य पाठपुरावा लागतो.तो आम्हीं करतोय.सगळ्यांना न्याय्य मार्गाने जातप्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आम्हीं तत्पर आहोत.
कालच्या मोहिमेत मंडळाचे अध्यक्ष:दत्तात्रय अन्नमवाड,उपाध्यक्ष:adv सुधीर राऊतवाड,कोषाध्यक्ष:मोहनराव गोपुलवाड,माजी उपाध्यक्ष:बालाजीराव इंगेवाड,ज्येष्ठ कार्यकारीणी सदस्य लक्ष्मणराव चटलावार,माधवराव अडबलवाड,यांचा सहभाग होता.
भोकर येथील समाज बांधव विलास चटलावर,वरगंटे,बैनवाड,मूपडे, पेरके,चींचाळकर व इतर काहीजण उपस्थित होते.
धर्माबाद येथे देवण्णा काका, दत्तात्रय तोटावार,वेंकटराव दारमोड,वेंकट मोमोड सायलू गंठोड,राजेश येवतीवाड,हणमंत बैनवाड,नागनाथ यडपलवार,देवानंद कानलोड,
बिलोली: शेट्टीवार,नरसिंग गोविंदवार,गोगरोड,व इतर काहीजण उपस्थित होते.