दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – शैक्षणिक वर्ष 2022 – 23 च्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिवाळीच्या सुट्ट्या दिनांक 17 ऑक्टोबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये घोषित झाल्या असुन महाराष्ट्र राज्यातील सर्वच आस्थापनावरील शैक्षणिक शाळा , कॉलेज , महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या 17 ऑक्टोबर 2022 पासून घोषित झाल्याने 16 ऑक्टोबर 2022 रोजी रविवार असुन सर्व शाळा , कॉलेज , महाविद्यालय तथा ज्युनिअर कॉलेज यांचा प्रथम सत्रातील शेवटचा कार्य दिवस 15 ऑक्टोबर 2022 हा असल्यामुळे या दिवशी सर्वच शाळा ,कॉलेज ,महाविद्यालयात तथा ज्युनिअर कॉलेजमध्ये सहामाही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संचलित श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड येथे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीर कुरुडे यांच्या अध्यक्षतेखाली व सेवानिवृत्त सहशिक्षक मधुकरराव कुरुडे ( शालेय समिती सदस्य, नांदेड ) , ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक माधव ब्याळे , कौठा शाखेचे इंन्चार्ज प्रा.सय्यद जमील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सहामाही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत शालेय समिती सदस्य माननीय सूर्यकांत रुखमाजी कावळे यांची प्राथमिक विद्यालयाच्या ( शा.स.स.उपाध्यक्षपदी ) निवड झाल्याबद्दल व श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुशील कुरुडे यांनी गोवा येथे पार पडलेल्या सहासी क्रीडा प्रकारात 55 मीटर उंचावरून बीजिंग जंप ( उढ्डान ) घेऊन यशस्वी उड्डाण केल्यामुळे क्रीडाशिक्षक सुशिल कुरूडे या दोन्ही मान्यवरांचा हृदय पूर्ण सत्कार माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने अर्थातच शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे तसेच कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक माधव ब्याळे व शालेय समिती सदस्य एम.पी. कुरुडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सत्कार सोहळ्याला उत्तर देत असताना शालेय समिती सदस्य माननीय सूर्यकांत कावळे यांनी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सर्वांचे आभार मानले आणि क्रीडाशिक्षक सुशील कुरुडे यांनी गोव्यातील साहसी क्रीडा प्रकारात 50 मीटर उंचावरून उड्डाण घेत असताना आपल्या संस्थेचे ब्रीदवाक्य *” जय क्रांती “* हा शब्द अतिशय धैर्याने आणि धाडसाने उच्चारत 55 मीटर उंचावरून उडान घेऊन आपल्यात असलेले सहास दाखवून दिले व ते उड्डाण यशस्वी पुर्ण केले आणि केवळ *” जयक्रांती “* या एका शब्दामुळे मी आत्मविश्वासाने व धाडसाने ते 55 मीटर उंचावरून उड्डाण पूर्ण करू शकलो असे मनोगत व्यक्त केले.
या सहामाही बैठकीचे आयोजन सांस्कृतीक विभागाच्या वतीने करण्यात आले होते प्रसंगी बैठकीची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेच्या प्रथेनुसार वंदे मातरम या गीताने झाली. प्रस्तावना पर्यवेक्षक माधव ब्याळे यांनी केली आणि कॉलेजचे व प्राचार्य परशुराम येसलवाड यांनी सहा महिन्यातील शैक्षणिक कामकाजाचा आढावा यावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच ज्युनिअर कॉलेजच्या वतीने श्रीमती तुळसाबाई शिंदे ( जाधव ) यांना सर्व प्राध्यापक मंडळीच्या वतीने जमा करण्यात आलेली दिवाळी भेट माननीय शाळेचे मुख्याध्यापक सुधीर कुरुडे व उपप्राचार्य परशुराम येसलवाड यांच्या हातून देण्यात आली तथा त्यानी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या अंततः सांस्कृतिक विभागाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहकार्य तथा फलक लेखनाची जबाबदारी अतिशय उत्कृष्ट पणे पार पाडत असल्यामुळे प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव यांचाही प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला या बैठकीचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कैलास पतंगे यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले तर आभार प्रदर्शनाचा भार प्रा.सोनटक्के शिवानंद मारोतराव यांच्यावर सोपवण्यात आला होता बैठकीची सांगता राष्ट्रगीताने झाली. या बैठकीस ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.