दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
शनिवार दिनांक:- 15 ऑक्टोबर 2022 माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवा निमित्त पक्षा तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, या सोबतच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच डॉ. कलाम यांच्या जयंती शुभ मुहूर्तावर शहरातील राजेंद्र प्रसाद वॉर्डा, टेकडी विभागात पक्षाच्या दुसऱ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, निवडणूक प्रभारी प्रा.नागेश्वर गंडलेवार, उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योतीताई बाबरे, कोषाध्यक्ष आसिफ शेख, युथ सचिव रोहित जंगमवार आणि युथ संघटक अलिना शेख यांनी राजकीय परिस्थिती बद्दल जागरूकता निर्माण करण्याकरिता आपले विचार मांडले.
यावेळी “AAP” बल्लारपूर शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.