दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी.
सातारा जिल्ह्यांतील दशनाम गोस्वामी मंडळाचे वार्षिक सभा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच समाज बांधव यांच्या उपस्थिंतीमध्ये बैठक सभा संपन्न. यामध्ये प्रलंबित प्रश्नांबाबत व समाजातील अडीअडचणी याविषयी तसेच वार्षिक महसूल सादर करण्याबाबत अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक सभेचे आयोजन करण्यांत आले होते. यावेळी सातारा गडकर आळीतील दपन विधीसाठी मशीन भूमी जागा मिळण्याबाबत अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या स्वाक्षरीने मान्यनीय जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसिलदार यांच्या पाठ पुरवठ्यांने व समाजातील सर्व बांधवांच्या विचारांने दफन विधी साठी जागा मिळणे बाबत याविषयी चर्चा झाली, तसेच इतर समाजातील काही अडीअडचणी व त्यांचे प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. सातारा दशनाम गोस्वामी समाजांचे अध्यक्ष माननीय जगन्नाथ गिरी गोसावी हे गेले अकरा वर्षापासून अध्यक्षपदावर विराजमान झाले असून. त्यांनी समाजातील विविध प्रश्न मार्गी लावली. तसेच स्वता अध्यक्ष असून अगदी संपर्कप्रमुख असल्याप्रमाणे त्यांचा सर्व जिल्ह्यांमधील व समाजांतील घराघरात त्यांचा चांगलाच परिचय आहे. त्यांचे काम अगदी तळागाळाशी चांगलेच जोडले गेले आहे.तसेच ते समाजासाठी चांगलेच लोकप्रिय असल्यांचे चांगलेच दिसून येत आहे. त्यांच्या बरोबरीने दशनाम गोस्वामी मंडळातील सर्व सदस्य पदाधिकारी अगदी तळागाळाशी जाऊन समाजातील अडीअडचणी सोडवत असतात.तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. रविवारी दुपारी झालेल्या या वार्षिक बैठकीला अध्यक्ष यांच्यासह सर्व सदस्य पदाधिकारी सचिव खजिनदार व समाजातील बांधव तसेच महिलावर्ग आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी जगन्नाथ गिरी गोसावी (अध्यक्ष) राजेंद्र गिरी (उपाध्यक्ष) अंकुश गिरी सचिव श्रीकांत गोसावी (खजिनदार) अक्षय गिरी गोसावी सदस्य, उमेश गिरी सदस्य, महेंद्र गिरी सदस्य, आकाश गिरी गोसावी, सदस्य प्रमोद गोसावी, सदस्य, राजेंद्र भारती (उद्योजक) राजू गिरीगोसावी (माजी उपसरपंच शाहूपुरी ग्रा.पं) सौ.मीना गोसावी सदस्य सौ.सुजाता गिरी गोसावी सदस्य (सातारा नगरपरिषद माजी नगराध्यक्षा) सौ.देविका गिरी गोसावी (एडवोकेट) रामचंद्र गोसावी,निवास गोसावी यावेळी अक्षय गिरी गोसावी यांनी बैठकीला उपस्थिंत असणाऱ्या सर्व गोसावी बांधवांचे आभार मानले.