दैनिक चालु वार्ता मलकापूर/प्रतिनिधी-
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित डॉ.राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय अंतर्गत ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत सातव्या सत्रातील कृषीकन्या स्नेहल जंगले, कोमल सुर्यवंशी, पुजा मोरे यांनी बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन तेथील कामकाजाचा अनुभव घेतला, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातून येणाऱ्या अन्नधान्य खरेदी विषयी सविस्तर माहिती दिली.तसेच बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १८९९ मध्ये झाली असून सध्याचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न खरेदी विक्री चालू आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अनेक प्रश्नांचे निरसन केले, या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाघ सर कार्यक्रम अधिकारी प्रा.महाजन सर, आर व्हि शेळके सर यांचे मार्गदर्शन लाभले.