दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यामध्ये प्रथमच राज्यस्तरीय पावरलिफटींग/बेंचप्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धेचे आयोजन इंदापूर तालुक्यामध्ये शिवशंभू पॅलेस- पुणे सोलापूर रोड वरकुटे पाटी जवळ बळपुडी ता. इंदापूर येथे २२ व २३ऑक्टोबर २०२२ला करण्यात आले आहे .
या स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात महाराष्ट्र पावरलिफ्टिंग असोसिएशनचे सेक्रेटरी संजय सरदेसाई यांनी याबाबत शिवशंभू पॅलेस ला पाठीमागील काही दिवसांपूर्वी भेट दिली होती, यावेळी त्यांच्यासोबत इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून विविध भागातून स्पर्धक भाग येणार आहेत. याच आयोजन तालुक्यातील तरूणांना व खेळाडुंना प्रेरणा मिळावी यासाठी इंदापूर शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नितीन शिंदे, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक देविदास पाटील ,शिवशंभो पॅलेस चे सर्वेसर्वा व देवपूजा पतसंस्थेचे संस्थापक सुधीर पाटील,न्यूट्रिरीच सप्लीमेंट, फिटनेस फोर्ट चे संस्थापक मयुर शिंदे यांनी केले आहे.