दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: जि.प.वित्त विभागाने एवढ वजनदार पगारीचा चेक कसे उचलुन नेले कमाल झाली , मला तर वाटले की चेक उचलुन न्यायला काय क्रेन आणले ,कि काय वाटत . जि.प.सर्व विभागाचे खुपच मनापासून धन्यवाद , गुरुजींच्या पगारीसाठी अतोनात मेहनत आहेत. कधी पगारीला बजट कमी पडू देत नाहीत , मेडीकल बिल असो की कोणतेही बिल तात्काळ मंजूर इतकी तत्परता आली जि.प.मध्ये बस. आमचा एकही गुरुजी नाराज नाहीच उलट यांच्या नावाने फुले वाहत आहेत. त्या शिक्षण विभागातील जे पगारीचे काम करणारे ते तर इतके बोलतात की जस काही यांच्या घरचा पैसा देत असल्यासारखे बोलतात. प्रशासनाने यांना लवकरच आवरा नाहीतर आता शिक्षक सेना हे बोलणे ऐकून घेणार नाही. हा बोलण्याचा मुजोरपणा संपवायला वेळ लागणार नाही. काम होत नसेल सोडून द्या . कशाला बसलात त्या टेबलावर ? गुरुजीची एक प्रकारे थट्टा सुरु केली काय ? प्रशासनाने तात्काळ या बाबतीत निर्णय घ्यावा. अन्यथा शिक्षक सेना गप्प बसणार नाही असे शिक्षक सेना नांदेड यांनी प्रशासनाला आव्हान केले आहे