दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पेठवडज :- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पेठवडज येथील शाखेत १३ गावातील ९ हजार ७८१ शेतकऱ्यांना ५ कोटी ७० लाख १ हजार २४२ रुपये जमा झाले असून ते पैसे इंग्रजी अक्षराच्या झेड पासून गावांची सुरूवात होणार असल्याचे शाखा अधिकारी श्री.रमेश विठ्ठलराव घोरवाडे साहेब यांनी माहिती दिली.ती पुढील प्रमाणे आहे,कल्लाळी येथील खातेदार ७७५ असून ५९ लाख ५९ हजार ५६४ रुपये,पेठवडज खातेदार २५९० रक्कम २ कोटी ३ लाख ७७ हजार ९६० रुपये,रुई खातेदार १२५२ रक्कम १ कोटी १५ हजार ६०० रुपये, कळका खातेदार ६३८ रक्कम ५० लाख ८५ हजार २०० रूपये, मंगनाळी खातेदार ७३३ रक्कम ५० लाख ५७ हजार ३७८, खंडगाव खातेदार ४०३ रक्कम २३ लाख ४६ हजार ६९२ रुपये, गोणार खातेदार ९०१ रक्कम ५६ लाख १६ हजार १९२ रुपये,नारनाळी खातेदार ३७२ रक्कम १९ लाख ९ हजार ६४० रुपये, मादाळी खातेदार ४३७ रक्कम २३ लाख ९४ हजार ५६८ रुपये,रहाटी खातेदार ३८५ रक्कम ३२ लाख ३७ हजार १२८ रूपये ,सिरसी (खुर्द) खातेदार ४७६ रक्कम ३२ लाख ५८ हजार ९५२ रूपये, सिरसी (बु.) खातेदार ४६४ रक्कम ३५ लाख ५ हजार २४६,वरवंट खातेदार ३५५ रक्कम ३२ लाख ३७ हजार १२८ रुपये याप्रमाणे दुष्काळी अनुदान प्राप्त झाले असून ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शाखा अधिकारी श्री.रमेश विठ्ठलराव घोरवाडे साहेब यांनी माहिती दिली आहे.यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीत आर्थिक हातभार लाभण्याची आशा आहे.