दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह वाजांच्या कडकडाटाने धुमाकूळ घातल्याने पांगरी येथे व्यंकटी ईश्वरा बुद्रुक यांच्या शेतामध्ये अखाड्यावरती बांधलेल्या म्हैसीवर विज कोसळली त्यात म्हैसीचा जागीच मृत्यू झाला आहे.
लोहा तालुक्यातील पांगरी शिवणी सायाळ वाळकेवडी पार्डी परीसरात अवकाळी पावसात सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व पावसाने कापसाचे पीक पण भुईसपाट आडवे पडले आहे या अवकाळी पावसात पांगरी येथील शिवारात व्यंकटी ईश्वरा बुद्रूक यांच्या शेतामध्ये अखाड्यावर बांधलेल्या जीवंत म्हैसीवर विज कोसळल्याने म्हैसीचा जागीच मृत्यू झाला असुन लोहा तहसीलचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता शेतकऱ्यांला आपत्कालीन विभागातुन मदत मिळेल अशी यावेळी प्रतिक्रिया दिली संबंधित सज्जाचे तलाठी यांना म्हैशीच्या पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.