दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
आखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी मा. मल्लिकाजुर्न खर्गे साहेब यांची निवड झाल्याने म्हसळा काँग्रेस मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे प्रतिपादन म्हसळा काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष व नगरसेवक मा. डॉ मोईज शेख यांनी दैनिक चालू वार्ताशी बोलताना केले पुढे ते असे म्हणाले की काँग्रेस पक्ष पुन्हा जोमाने 2024 निवडणुकीला सामोरे जाईल आणि सत्तेची गणिते नक्कीच बदलेली असतील काँग्रेस पक्षाचे मनोभावाने कार्य केलेलं आहे अश्या कार्यकर्त्याची पक्ष्याने कदरच केलेली आहे व त्यांना न्याय देण्याचे काम केलेले आहे मा मल्लिकार्जुन खर्गे साहेबाच्या रूपाने पक्षाला एक वैचारिक, अभ्यासू सर्वाना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व लाभलेल आहे. यां वेळी म्हसळा तालुका कार्यकारणी, शहर कार्यकारणी,
कार्यकर्ते पदाधिकारी यांनी निवडीचे स्वागत व अभिनंदन केले व आनंद साजरा केला.