दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
************
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना निवेदन देऊन यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने अंगणवाडी बालवाडी सेविकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तोपर्यंत प्रतिमा १८ हजार ५०० रुपये मानधन देण्यात यावे, शहरी भागांतर्गत कार्यालयांना घरभाडे देण्यात यावे, या व अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी लक्षणीय उपस्थिती होती.