दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवने
मंठा सणासुदीला गाव अंधारात केहाळ वडगाव येथील दोन वर्षांपासून सिंगल फेज ट्रान्सफर्मार जाळले होते. पण ते एक महिन्यापासून मंठा येथील महावितरण कार्यालयात आणून घातले आहे. तरी आमच्याकडे ट्रान्सफार्मर ऑइल उपलब्ध नसल्याचं कारण सांगून उडावाउडवीचे उत्तर देत आहे. गावकरी निवेदन देण्यासाठी आले असता कर्मचारी अरेरावीची भाषा वापरत आहे. गावातील तारा पोल ची दूरअवस्था झाली आहे महिना ऊलटुनही याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे.गावकऱ्यांनी मागणी केली लकरात लवकर ट्रान्फर द्यावा व गावतील तीन वस्ती मिळून एकच सिंगल फेज ट्रान्सफर आहे त्यामुळे ओव्हर लोड होत आहे लोडणूसारपुन्हा एक ट्रान्सफरची गरज आहे. दिवाळीला उजेड करावा ही विनंती केली.नसता गावकरी आपल्या कार्यालयासमोर उपोषण करू. भागवत दवणे,बालासाहेब नाईक,अनंतराव हरबक, कैलास नाईक,रामभाऊ दवणे, रामप्रसाद सिरसाट निवेदन देताना उपस्थित होते.