दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:प्रचलित अनुदान सुत्रा नुसार शंभर टक्के
अनुदान देवून आपली वेठबिगारी संपवावी म्हणून हजारो शिक्षकांनी दहा ऑक्टोबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी (ता.२४) सर्वत्र दीपावलीचा सण साजरा होत असताना, या शिक्षकांची दिवाळी काळीच साजरी होत असल्याने शिक्षकांमध्ये संता ण झाला आहे.राज्यातील इतर घटक आनंदाने दिपोत्सव साजरा करत असताना निसर्गाने शेतकऱ्यांवर तर शासनकर्त्यांनी शिक्षकांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे. निकषपात्र विनाअनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार अनुदान द्यावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मराठवाड्यातील आद्य शैक्षणिक चळवळ मराठवाडा शिक्षक संघ सक्रीय सहभागी असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
त्यात म्हटले की, शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली ता.दहा ऑक्टोबर पासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. वीस वीस वर्षांपासून या शिक्षकांना विनावेतन किंवा अल्प वेतनावर राबवून घेतले जात आहे. आता माघार घेऊ नये.सरकार जो पर्यंत प्रचलित अनुदान सुत्रा नुसार शंभर टक्के अनुदान देत नाही तो पर्यंत माघारी न फिरण्याचा निर्धार शिक्षक समन्वय संघाने केला असून मराठवाडा शिक्षक संघ त्यास तेवढीच
तोलामोलाची साथ देत आहे.
काळी दिवाळी साजरी करून सर्वांनी शासनाचा निषेध करावा असे आवाहन मराठवाडा शिक्षक व्यंकटराव चिलवरवार, रविद्र वाकोडे, सहसचिव रेखा सोळंके आदींनी केले आहे.
संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव,
सरचिटणीस राजकुमार कदम, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार, रविद्र वाकोडे, सहसचिव रेखा सोळंके आदींनी केले आहे.