दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:देगलूर येथे दि. २३/१०/२०२२ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा मार्गांची रविवारी दुपारी देगलुरात पाहणी केली. ही यात्रा सुरळीत व्हावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षेचे नियोजन करण्याचे आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना सांगितले.
देशातील वाढती महागाई, बेरोजगारी व अन्य ज्वलंत प्रश्नांवर मोदी सरकार विरोधात रान पेटविण्यासाठी राहुल गांधी यांनी दक्षिण ते उत्तर असे कन्याकुमारीपासून दि. ७ ऑक्टोबर रोजी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देगलूर शहरात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच येथून बदलून गेलेले पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दंगलूरला येऊन अनेकदा रूट पाहणी व सुरक्षा संदर्भात आढावा घेतला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रविवारी देगलूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या वेळी जा. जिस अंतापुरकर यांनी यात्रेसंदर्भातील माहिती दिली. दि. ६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांचा देगलूर शहरातील चित्रावर मिलच्या मैदानावर मुकाम आहे.
त्या दृष्टिकोनातून सुरक्षा संदर्भात नियोजन करण्यासाठी एसपी कोकाटे यांनी तेलंगणा बॉर्डर व मुक्काम स्थळाची पाहणी केली आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यात्रा बंदोबस्त व्हीआयपी सिक्युरिटी, येल्फेअर व कॅम्प साईडची पाहणी यासह अन्य योग त्या सूचना अधिनस्त अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक सोहन माछरे सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगम परगेवार सर मोरे सर आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.