दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी
आधार प्रतिष्ठानाचा डाॅ.श्रीकांत पाटील यांच्या बालसाहित्यस राज्यस्तरीय पुरस्कार.
आधार प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालय बोरगाव ता.तासगांव जि.सांगली या वाचन संस्थेचा आधार राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार २०२२साठी लॉकडाऊन कांदबरीचे प्रसिद्ध लेखक डॉ.श्रीकांत पाटील यांच्या !! सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल !! या पुस्तकाला जाहीर झाला आहे.
डॉ.श्रीकांत पाटील हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक असून त्यांना विद्यार्थी दिशेतही शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा पुरस्कार मिळालेला आहे.तसेच स्वातंत्र्योत्तर सामाजिक नाट्यसृष्टी या संशोधन पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा साहित्य संशोधन पुरस्कार व सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल या बालकादंबरीला महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी बाल कादंबरी पुरस्कार मिळालेला आहे.
महाराष्ट्रातील अनेक संस्थाचे कांदबरी लेखनासाठीचे पुरस्कार त्यांच्या लॉकडाऊन कादंबरीला मिळालेले आहेत.तसेच ऊसकोंडी ही त्यांची कादंबरी सध्या चर्चेत आहे.
साहित्य क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय असे योगदान आहे.त्यांची बालसाहित्याची पुस्तके खूप गाजलेली आहेत. या पुरस्कार प्राप्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.