दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : हजारो मैलांचे अंतर पार करून दुर्गम प्रदेशात एक धागा पोहोचतो आणि दोन अनामिक व्यक्तीमध्ये निर्माण होते स्नेहाचे, विश्वासाचे, राखीचे अतूट बंधन, आठ वर्षांपूर्वी पाठविलेल्या राखी, पत्राची आठवण ठेवून निळ्याचे भुमिपुञ जवान माधव मोरे शोध घेत अखेर धायरीत पोहचले आणि लाडक्या बहिणीची भेट घेऊन ही दिवाळी अनोखी ठरवली.
धायरी येथील कै. बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालयाच्या सांचल खेडेकर या विद्यार्थिनीने शाळेतील उपक्रमांतर्गत कारगिल सीमेवर तैनात असलेले निळ्याचे भुमिपुञ जवान माधव मोरे यांना २०१४ साली राखी व पत्र पाठवले. तेव्हापासून त्यांना या बहिणीच्या भेटीची ओढ होती. विविध ठिकाणी झालेल्या पोस्टिंगमुळे ही भेट शक्य होत नव्हती परंतु राखीसोबत शुभेच्छा पत्रावरील शाळेचा पत्ता आणि जपून ठेवलेले पत्र एवढाच मार्ग त्या जवानाच्या हाती होता. काही महिन्यांपूर्वी योगायोगाने भेटलेल्या या ह त्यांची नियुक्ती पुण्यातील औप २४ मराठा बटालियन येथे झाली. शाळेच्या खेडेकर ही नावाची चौकशी करत शेवटी त्यांनी संस्थाचालक काकासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क करुन कधीच न भेटलेल्या या बहिणीची भेट घेत हि भाऊबीज हि खास ठरली.
◾मला भाऊ नाही; परंतु माझा भाऊ एवढेच कष्ट करूरुन सैन्यात गेला असता तशी मी कल्पना करून हे पत्र लिहिलं होतं, आज अभिमान वाटतो की मला माझा भाऊ मिळाला.
__________________________
सांचल खेडेकर, धायरी
◾सीमेवर असताना कुटुंबापासू दूर असलेल्या या रात्रीचे अप्रूप असते. माझ्या आयुष्यामधील हे पत्र आणि राखी सर्वात मोठा अनमोल ठेवा आहे.
_______________________________
– माधव मोरे ( २४ मराठा बटालियन निळा ता. लोहा जि. नांदेड )
भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर आठ वर्षांनंतर भेट झालेल्या भावा – बहीणीच्या अनोख्या भेटीची चर्चा लोहा तालुक्यातील निळा जन्मभुमीसह जिल्हाभरासह राज्यभरात पसरत असल्याने जवान माधव मोरे यांचे राज्यभरात कौतुक केले जात आहे. निळ्याचे उपसरपंच गजानन पाटील मोरे यांचे ते बंधू आहेत.