दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांची पदयात्रा तमलुर ते श्रीक्षेत्र कपिलधार (मन्मथ स्वामी) पदयात्रा देगलूर येथे पोहोचल्यानंतर देगलूर नगरपालिके समोर लोकप्रिय नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसेटवार यांच्यातर्फे पदयात्रे करूंना चहापाणी कार्यक्रम ठेवण्यात आले होते तदनंतर पदयात्रा कावळगाव या गावी मुक्कामी गेली असता कावळगाव येथील प्रसाद दाते आमचे मामा वैजनाथराव येरमुने यांच्या निवासस्थानी गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी व पदयात्रे करूंना शुभेच्छा देण्यासाठी लोकप्रिय आमदार जितेश अंतापुरकर,लोकप्रिय नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार,जनार्दन बिरादार,बसवराज पाटील वनाळीकर,रुपेश पाटील भोकसखेडकर,सचिन आटकळे,राजा कांबळे,अजय वानखेडे आदी उपस्थित होते