दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे राहणारे राजेश गायकवाड यांची बिरसा क्रांती दल संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी सर्वोनमत्ते निवड करण्यात आली आहे.
राज्यउपाध्यक्ष डी.बी. अंबुरे
यांच्या मार्गदर्शनाखाली सहस्रकुंड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सुभेदार तथा बिरसा व्हालिटीयर फोर्सचे नारायण पीलवंड म्हणून उपस्थित होते
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चांगदेव खुडे, पत्रकार परमेश्वर पेशवे, गौतम कांबळे, दशरथ आंबेकर आनंद चांदोडे, सुनील वानोळे, अविनाश कराळे, काशिनाथ ढोले दत्ता लोखंडे,माधव तांबारे,चांगदेव ढोले, किसन गायकवाड, खंडू मिरासे, इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपल्या मूलभूत हक्कासाठी बिरसा क्रांती दल संघटनेत सामील होऊन आदिवासींच्या हक्कासाठी लढा द्यावा असे आव्हान बिरसा क्रांती दल संघटनेचे राज्यउपाध्यक्ष डी बी अंबुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.
यावेळी बिरसा क्रांती दल संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी राजेश किशन गायकवाड यांची नियुक्ती करून माजी सुभेदार नारायण पिळवंट यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी तालूक्यातून आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम लोखंडे यांनी केले तर आभार गणपत डुकरे यांनी मानले.