दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी चुकीच्या पद्धतीने मनसे अध्यक्ष श्रीमान राजसाहेब ठाकरे यांच्या बद्दल मत व्यक्त केले, मी मनसेचा कार्यकर्ता म्हणून खासदार रावसाहेब दानवे यांना आव्हान करतो मा.राज ठाकरे यांचे नाव सोडून तुम्ही २०२४ ला खासदार होऊन दाखवा, तुमचा लगा आमच्या हातात आहे, तुम्ही जनतेला चकवा देऊन आज पर्यंत लोकसभेत गेलेले आहात, तुम्ही नाक लावून मीडियासमोर सांगतात मी केंद्रात आणि राज्यात काम करतात असे सांगतात पण तुम्ही २०२४ ला जालना लोकसभा मतदारसंघातून खात्रीने सांगतो निवडून येणार नाहीत,आणि २०२४ ला काय होणार याची तुम्हाला अजिबात कल्पना नाही नुसता निवडणुकीचा निकाल बघा निकालाच्या दिवशी तुमची हार झालेली असेल, तुम्ही ई.डीच्या माध्यमातून मतदार संघ सेफ करण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही कोठे अटकणार आहात याची भनक सुद्धा तुम्हाला लागलेली नाही आणि लागणार सुद्धा नाही, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाद नव्हता करायला हवा पण आता जाऊ द्या तुम्ही सुरुवात केली आम्ही शेवट करू ही गोष्ट लक्षात ठेवा. मी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना…