दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळयासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्यास ग्रामीण भागातील गुणी खेळाडूंना चांगली संधी प्राप्त होते या संधीचे सोने करण्यासाठी आपले क्रीडा कौशल्याची चमक राष्ट्रीय पातळीवर दाखवण्याची चांगल्या खेळाडूंना संधी मिळते असे प्रतिपादन माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी केले.
कंधार तालुक्यातील नवरंगपुरा क्रीडा संकुल येथे टेनिस बॉल कंधार प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महेश राजेंद्र भोसीकर यांनी केले होते. या क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण करताना ते बोलत होते. कंधार प्रीमियर लीग ही स्पर्धाचे प्रथम पारितोषिक मुंडे अकॅडमी तर द्वितीय क्रमांक महेश भोसीकर ११ संघाने पटकवला. मॅन ऑफ द मॅच इन फायनल, मॅन ऑफ द सिरीज, मोस्ट रन्स इन द टूर्नामेंट, मोस्ट विकेट टूर्नामेंट, अशा विविध स्पर्धेचे बक्षीस माजी आमदार ईश्वराव भोसीकर यांच्या हस्ते विरण करण्यात आले.
पुढे बोलताना भोसीकर म्हणाले की ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळण्यासाठी व क्रीडा कौशल दाखवण्यासाठी, ग्रामीण भागातील खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या खेळाडूंना राज्यस्तरावर संधी प्राप्त करून देण्यासाठी विविध ठिकाणी स्पर्धेच्या आयोजन करण्यात यावे. माझे नातू महेश भोसीकर यांनी क्रिकेट सामन्याच्या आयोजन केले होते. या सारख्या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळते असे भोसीकर म्हणाले.
या कार्यक्रमाला युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महेश भोसीकर, मोहम्मद फैसलोद्दीन, शंतनु कैलासे, नय्यर बेग, योगेश मुंडे, मगदूम परदेसी, मोहम्मद शोएब, सुनील कांबळे, नदीम शेख, मंगेश कांबळे, मोहम्मद उबेद, मुहम्मद फराज, मुस्तफा शेख, अशफाक शेख, मोहम्मद तनवीर यांच्यासह कार्यकर्ते, खेळाडू व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावित व सूत्रसंचालन मिर्झा मजीद बेग यांनी केले.