दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:
देगलूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक स्व.अरुणराव कोंडेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते,अखेर रविवार दि. 30 ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
स्व.अरुण कोंडेकर हे गेल्या 35 वर्षांपूर्वी बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. ज्या पाच कार्यकर्ते मिळून देगलूर शहरात शिवसेनेचे पाय रचला त्या पाचपैकी एक म्हणजे स्व.अरुण कोंडेकर होते.त्यांच्या पार्थिवावर (दि 30) राविवार दुपारी दोन वाजता सार्वजनिक वैकुंठ धाम येथव अंत्यसंस्कार करण्यात आले
त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली ,तीन मुले ,जावई,नातवड असा मोठा परिवार आहे.
राष्ट्रवादी चे नंदुसेठ शाखावार यांचे इवाई तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल कोंडेकर यांचे वडील होत.