दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
औंध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील वडी ता. खटाव येथील चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा छडा लावण्यांत औंध पोलिसांना यश आले असून. सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करुन औंध पोलिसांनी ट्रॅक्टर चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या. यामध्ये सागर रामचंद्र मोरे (वय २६ रा.भुडकेवाडी ता.पाटण) तसेच एक विधीग्रस्त बालक अशी ताब्यांत घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीनुसार वडी ता.खटाव गावच्या हद्दीतून संदीप विष्णू येवले यांचा ट्रॅक्टर दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी रात्री चोरीला गेला होता. याबाबत पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल होताच. औंध पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांसमवेत तपासाची चक्रे गतिमान करीत ट्रॅक्टर चोरट्याच्या अखेर मुसक्या आवळल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर पोलीस संशयित आरोपी पर्यंत पोहोचण्यांत यशस्वी झाले. या प्रकरणात पोलिसांनी सागर रामचंद्र मोरे (वय २६ रा.भुडकेवाडी ता.पाटण) तसेच एक विधीग्रस्त बालक यांना ताब्यांत घेवुन चोरी गेलेल्या ट्रॅक्टर किंमत पाच लाख रुपये आणि दोन चोरीच्या मोटरसायकली अंदाजे किंमत एक लाख रुपये असा सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात औंध पोलिसांना यश आले. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सहा फौजदार बी.एन जाधव सुभाष डुबल पोलीस हवा. प्रशांत पाटील राहुल वाघ ,संतोष पाडवे पंकज भुजबळ ,महेश जाधव ,जयवंत शिदे भीमराव वळकुंदे,किरण जाधव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.