दैनिक चालू वार्ता धाड सर्कल प्रतिनिधी -सलमान नसीम अत्तार.
चांडोळ,ता.२९:बुलढाणा तालुक्यातील कुंबेफळ गावातील एका ५५ वर्षीय इसम शेषराव जाधव यांचा शेतीच्या वादातून खून झाल्याची खळबळ जनक घटना सायंकाळी साडे पाच वाजता उघडकीस आली.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार धाड पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम कुंबेफळ येथील शेषराव जाधव वय ५५ वर्षे यांचा शेतीच्या वादातून गावातीलच आरोपी समाधान पंडित जाधव वय ३५ वर्ष याने कुंबेफळ शिवारातील गावाच्या अर्धा किमी अंतरावर असणाऱ्या गट क्रमांक २७ मधील शेतात धारदार शस्त्राच्या सहाय्याने पोटात वार करून ५५ वर्षीय वृद्दाचा खून केल्याची घटना घडली.आरोपीने खून केल्यानंतर स्वतः पोलिस स्टेशन धाडला जमा झाला.घटनेचा पुढील तपास धाड पोलिस करील आहे.